• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ByEditor

Jun 12, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे मंगळवार, दि. ११ जून २०२४ रोजी मापगाव येथील धर्मशाळेत ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे मापगाव पंचक्रोशीतील १०वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या ११२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर सोगाव येथील प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मापगाव पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमामधील १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये साईश सतीश पेडणेकर याने ९३% गुण मिळवले, तर रोशनी सूरज घरत हिने ९२.८०% गुण मिळविले आणि वैष्णवी महेंद्र हुमणे हिने ९२.४०% गुण मिळविले तसेच सेजल प्रदीप मंडल हिने ९१.०७% गुण मिळविले याचबरोबर बारावीमध्ये आर्या मंगेश सोनवणे हिने ९०% गुण मिळविले, तर साहिल तारानाथ सुर्वे याने ८६.३३% गुण मिळविले तसेच मृदुला संतोष घरत हिने ८१.६६% गुण मिळविले. अशा मापगाव पंचक्रोशीतील एकूण ११२ विद्यार्थी व विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र, स्कुल बॅग व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर सर्व विद्यार्थांना स्कुल बॅग व प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सर्व उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मोरे मॅडम, प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम, श्री क्लासेस चोंढीचे संतोष राऊत यांनी कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावचे ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, अखिल भारतीय हक्क ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सचिव बाबूशेठ थळे, ग्रामपंचायत सदस्या व भारतीय जनता पार्टी अलिबाग कार्यकारणी सदस्य तसेच महिला मोर्चा उपाध्यक्षा स्नेहा रुत, शिवसेना (शिंदे गट) मापगाव विभागप्रमुख जगदीश सावंत, श्री क्लासेस चोंढीचे संतोष राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य मजीद कूर, मुद्स्सर कुर, गितेश करळकर, अजित घरत, प्रभाकर मोहिते, तेजस काठे, बाबू सोंडे, संतोष रुत, गितेश करळकर, सुनिल अनमाने, दत्ता गुरुजी, संजय राऊत, नागेश राऊत, प्रकाश गुळेकर, मोरे मॅडम, लायन विद्या अधिकारी, प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम, जान्हवी बारे, जागृती सावंत, शिल्पा अनमाने, सिद्धी क्लासेसच्या घरत मॅडम, संगिता मल्हार, शफी वाकनिस, दत्तात्रेय राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पाटील, भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका सरचिटणीस दिनेश राऊत, वजाहत कुर, राकेश करळकर, रुपेश निर्गुण, संतोष घरत, भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका युवा मोर्चा सदस्य अनुराग मोहिते असे अनेक मान्यवर तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि त्यांचे पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांच्यावतीने अखिल भारतीय हक्क ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सचिव बाबूशेठ थळे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बाबूशेठ थळे यांना उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच मापगाव येथील आदित्य प्रभाकर मोहिते, महेश मनोहर कैलकर, ओमकार संतोष कैलकर यांनी प्रथमच मापगाव येथून नेपाळ देशात दुचाकीवरून प्रवास करून काठमांडू, पोखरा, पशुपतीनाथ येथील तीर्थक्षेत्राचे १५ दिवसात दर्शन घेऊन सुखरूप व यशस्वीरित्या आपल्या मूळगावी परत आल्याबद्दल त्यांचा ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!