• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मध्यवर्ती शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी शिक्षण संचालकांची घेतली भेट

ByEditor

Jun 12, 2024

सलीम शेख
माणगाव :
महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेने राज्यातील प्रलंबित प्रश्नाविषयी शिक्षण संचालक (प्रा.) महाराष्ट्र राज्य पुणे यांची मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे सरचिटणीस राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

१) केंद्रप्रमुख भरती बाबत या विषयासंदर्भात वारंवार निवेदन देऊन राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये चुकीच्या पद्धतीने कार्यवाही होत असल्याने अनेक शिक्षक संघटनाचा न्यायालयात व शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू होता आज मान. शिक्षण संचालकांसोबत बैठक घेऊन तातडीने सर्व जिल्हा परिषदेंना प्रशिक्षित पदवीधर सेवा जेष्ठता ग्राह्य धरून केंद्रप्रमुख पदे तातडीने भरण्यात यावी २१ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२) शासन निर्णयानुसार दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत रुजू झालेल्या दि. १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर रुजू झालेल्या राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्ती पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.
३) शासनाने दिलेल्या पैशांमध्ये विद्यार्थी गणवेश शिलाई होत नाही शासनाने आम्हाला पूर्ण तयार असणारे गणवेश पुरवावेत अशी मागणी करण्यात आली.
४) जिल्हा परिषद कार्यरत असणाऱ्या शिक्षकांमध्ये विज्ञान व गणित विषयाचे पदवी धारक असल्याने पवित्र पोर्टल भरतीपूर्वी उपशिक्षकांना विषय शिक्षकांचे पदोन्नती देऊन ती पदे शिक्षकातून भरण्यात यावे यासंदर्भात चर्चा केली व निवेदन दिले येत्या दोन दिवसांमध्ये कशा पद्धतीचे आदेश सर्व जिल्हा परिषदेला देण्यात येतील.
५) यावर्षी राज्यातील शिक्षकांना दिवाळी आडवांस मिळाला नाही त्या संदर्भात मान. शिक्षण संचालक महोदयाची चर्चा करून निवेदन दिले.
६) संच मान्यता जुन्या पद्धतीनेच करण्यात यावी नवीन संच मान्यता लागू करू नये या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.
७) केंद्रप्रमुख व पदोन्नती मुख्याध्यापक यांना पदोन्नती मिळाल्यापासून पुर्वलक्षी प्रमाणे वेतन वाढ लागू करणे या संदर्भात शासनास अहवाल सादर करणे याविषयी चर्चा करण्यात आली.
८) सन २००४ नंतर लागलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळताना जो अन्याय झालेला आहे यासंदर्भात शासनास संघटनाने सादर केलेला अहवाल शासनास सादर करावा तसेच पदवीधर शिक्षकांना शंभर रुपये वेतनामध्ये उपशिक्षकापेक्षा कमी मिळतात त्या संदर्भातील निवेदन शासनास सादर करावे.

याविषयी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष तथा मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे सरचिटणीस राजेश सुर्वे , पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे, मनोज पदवीधर शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मनोज मराठे, प्रफुल पवार संचालक अलिबाग पतपेढी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!