• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महिलांनी वाढत्या वयाबरोबर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करणे आवश्यक

ByEditor

Jul 2, 2024

रायगड जनोदय ऑनलाइन – वाढत्या वयाबरोबर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. विशेषतः 30 ते 40 वयोगटातील. 40 वर्षावरील महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. वयाच्या 40व्या वर्षी महिलांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हार्मोन्समध्ये असंतुलन होऊ लागते. हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो.

या काळात तुम्ही काय खात आहात हे अधिक महत्त्वाचे ठरते. प्रोटीने, कार्ब्ज, फॅट, व्हिटॅमिन, खनिजे सर्व आवश्यक आहेत. जर तुम्ही तुमचा आहार बरोबर ठेवला नाही तर ऑस्टिओपोरोसिस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग इत्यादी त्रास देऊ शकतात. अशा स्थितीत महिलांनी या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. यासाठी महिलांनी काही महत्त्वाच्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

महिलांनी या पदार्थांचा करावा आहारात समावेश

१. दही / Yogurt :
दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया आढळतात. तसेच दह्याचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते जे हाडांसाठी चांगले असते. (Womens Diet)

२. लसूण / Garlic :
लसणाचे सेवन सर्व वयोगटातील लोकांनी केले पाहिजे. लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. 40 नंतर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा स्थितीत लसूण तुम्हाला वाचवण्याचे काम करतो.

३. अंडी / Eggs :
महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन-डी आणि आयर्न या दोन्ही घटकांची कमतरता असते. महिलांच्या आरोग्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. अंडे महिलांसाठी सर्वोत्तम अन्न आहे.

४. नट्स / Nuts :
वाढत्या वयाबरोबर महिलांनी आपल्या आहारात नट्सचा समावेश करावा. नट्समध्ये व्हिटॅमिन, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि फायबर असतात. ते भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यासोबतच अनेक आजारांपासून बचाव करतात.

५. आंबट फळे / Sour Fruit :
आंबट फळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. यामध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन सी आणि सर्व प्रकारचे पोषक घटक आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. या वयात महिलांना अनेकदा लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा त्रास होतो. या आजारांमध्ये आंबट फळांचे सेवन खूप फायदेशीर ठरते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!