• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुनील तटकरेंकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी

ByEditor

Jul 19, 2024

‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिस अधीक्षकांना निर्देश

प्रतिनिधी
नागोठणे :
रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (दि. 19 जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. यावेळी महामार्गाच्या दुरवस्थेवर खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महामार्गाच्या दुरवस्थेसाठी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिल्या.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी हायवेच्या दुरवस्थेला कारणीभूत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली. या तक्रारीद्वारे त्यांनी नॅशनल हायवेचे अधिकारी व संबधित ठेकेदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तटकरे यांनी स्वतः याबाबतची फिर्याद दिली.

दरम्यान, या सुनील तटकरे यांनी देखील त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असताना पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सहभागी झालो”.

खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे येथील हॉटेल कामत, पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि खारपाडा टोल येथे बैठक घेऊन जनतेशी संवाद साधत सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महार्गाच्या प्रश्नावरुन खासदार तटकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं अधिकाऱ्यांसह स्थानिकांना पाहायला मिळालं.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!