कोकणातून विधानसभा मतदार संघाच्या आढाव्याला सुरुवात?
मिलिंद माने
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यात म्हणावे तसे यश न मिळाल्याने त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होण्याअगोदर भाजपाने निवडणूक पूर्व तयारीला सुरुवात केली असून राज्य मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांना प्रत्येक मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या सूचना दिल्या असून त्याचाच भाग म्हणून भाजपाने कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून विधानसभा मतदार संघ निहाय आढाव्याला सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिंदे गट व अजित पवार गटामुळे भाजपाला अनेक लोकसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी भाजपाने आत्ता ताक देखील फुंकून पिण्याचे ठरवले आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपाने राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांना राज्यातील भाजपा लढवणार असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार भाजपाने प्रत्येक मंत्र्यांना मतदारसंघ वाटून दिले असून त्या त्या मतदारसंघात जाऊन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या त्या विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती निहाय आढावा घेण्याचे सांगितल्याने संबंधित मंत्री पक्षाने दिलेल्या आदेशानुसार कामाला लागले आहेत.
कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात केवळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग या एकाच लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या रूपाने एकमेव खासदार निवडून आला आहे. रायगड व मावळ यादव दोन लोकसभा मतदारसंघांपैकी रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे तर मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे दोन खासदार आले असल्याने भाजपाने विधानसभेसाठी आपली व्ह्यूव रचना तयार करण्यास सुरुवात केली आहे.
रवींद्र चव्हाण कोकण दौऱ्यावर
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नामदार रवींद्र चव्हाण 24 जुलैला पनवेल व उरण, पेण या तीन विधानसभा मतदार संघात सध्या भाजपाचे आमदार असून त्या मतदारसंघाचा आढावा ते घेणार आहेत तर 25 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व रत्नागिरी या दोन विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार असून सध्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार नाही त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागर चिपळूण या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे तर 26 जुलै रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार आहेत.
एकंदरीत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी चालू केली आहे. कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत, त्यामुळे कोकणातून नवीन मतदार मतदार संघातून भाजपा नव्या उमेदवारांना विधानसभेची उमेदवारी देऊन निवडणूक लढवण्याचा तयारीत असून त्याचाच एक भाग म्हणून विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांना कोकणातील तीन जिल्ह्याचा आढावा घेण्याची तयारी चालू केली आहे.