क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध रविंद्र पाटील यांनी काल आरडीसीएची नवनिर्वाचित कार्यकारणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. त्यामध्ये एकूण १९ लोकांची कार्यकारणी असणार आहे. कमिटीमध्ये १० पदाधिकारी व ९ सदस्य असणार आहेत.
आरडीसीएची संपूर्ण कार्यकारणी पुढील प्रमाणे :-
१) अनिरुद्ध रविंद्र पाटील – अध्यक्ष
२) प्रदिप नाईक – सरचिटणीस
३)चंद्रकांत मते – कार्याध्यक्ष
४) सुनिल घरत – उप कार्याध्यक्ष
५) संतोष भोईर – उपाध्यक्ष
६) राजेश पाटील – उपाध्यक्ष
७) यशवंत साबळे – उपाध्यक्ष
८) प्रशांत ओक – खजिनदार
९) जयंत नाईक – सहसचिव
१०) बशीर चिचकर – सहसचिव
११) किरीट पाटील – सदस्य
१२) संदीप पाटील – सदस्य
१३) गणेश कडू – सदस्य
१४) अँड. पंकज पंडित – सदस्य
१५) कौस्तुभ जोशी – सदस्य
१६) समीर मसुरकर – सदस्य
१७) सतिष पाटील – सदस्य
१८) प्रदिप खलाटे – सदस्य
१९) विनय भगत – सदस्य
अशी १९ लोकांची संपूर्ण कार्यकारणी २०२४ ते २०२९ या कालावधीत आरडीसीएचे काम पाहणार असल्याचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी जाहीर केले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व वयोगटातील खेळाडूंना (मुलं-मुली), पंच, स्कोअरर्स, क्रिकेट प्रशिक्षक यांना लेदर बॉल क्रिकेटकडे आकर्षित करून त्यांना विविध स्पर्धांचे, कॅम्पसचे आयोजन करून येणाऱ्या काळात न्याय देण्यासाठी क्रिकेटला योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील सर्व जुन्या व नवीन लोकांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी केले आहे.