• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“असे कृत्य करणाऱ्यांना फाशीच…कुठेही माफी मिळायला नको”

ByEditor

Jul 30, 2024

यशश्री प्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी उरणमध्ये दिली संतप्त प्रतिक्रिया

शक्ती कायदा पास करावा, शर्मिला ठाकरेंची थेट पंतप्रधानांना विनंती

घन:श्याम कडू
उरण :
क्रूरकर्मा आरोपीला कोणतीही दयामाया न दाखविता त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी मनसेच्या शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. आज दि. ३० जुलै रोजी ५ दिवस होऊनही यशश्री शिंदे प्रकरण उरणमध्ये धगधगत आहे. चौकाचौकात मोर्चे निघत आहेत. संतापलेली जनता रस्त्यावर उतरून आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला भर चौकात फाशी द्या…अशा मागण्या करत आहे. अनेक महिला नेत्या उरणमध्ये येत शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उरणमध्ये आल्या आहेत. त्यांनी या विषयाबाबत अत्यंत उग्र प्रतिक्रिया देत, थेट पंतप्रधानांना याबाबत विनंती केली आहे.

महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा ताबडतोब पास करावा, अशी विनंती शर्मिला ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदींना केली आहे. इतके हीन कुकर्म करणाऱ्याला फक्त फाशीचीच शिक्षा व्हावी, त्याला कुठेही माफी मिळायला नको, राष्ट्रपतींकडे जरी माफीची मागणी केली तरी आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, असे वक्तव्य यावेळी शर्मिला ठाकरे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!