• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ठेकेदाराकडे खंडणी मागणाऱ्या युट्यूब चॅनलच्या संपादकाविरोधात रोह्यात गुन्हा दाखल

ByEditor

Aug 10, 2024

गुगल पेद्वारे रक्कम स्वीकारूनही अधिक रकमेची केली मागणी

रायगड : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम व्यवस्थित नाही म्हणून तुमच्या बद्दल बदनामीचा मजकूर लिहून तो पेपरला प्रसारित करतो अशी धमकी देत ठेकेदाराकडे वेळोवेळी खंडणी मागणाऱ्या युट्यूब न्यूज चॅनल संपादक राकेश येलकर याच्यावर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या दुनियेत सध्या युट्यूब चॅनलने अधिक भरारी घेतली असली तरी रोह्यात विशेषतः ग्रामीण भागात बोगस चॅनलच्या पत्रकारांनी मांडलेला उच्छाद या प्रकरणावरून समोर आला आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खंडणी वसुलीचे अनेक प्रकार देखील घडले आहेत. मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्या बोगस पत्रकारांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

राकेश गणेश येलकर (वय ३२, रा. देवकान्हे. ता. रोहा) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो लोकशाही यू-ट्युब न्यूज चॅनेल व पोर्टलचे पत्रकार, संपादक म्हणून काम करत आहे. रविवार, (ता. ४) रोजी ११:३० वाजता तालुक्यातील धानकान्हे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम सुरू असताना आरोपी याने मी लोकशाही यूट्यूब चॅनलचा संपादक आहे असे भासवून फिर्यादी सूरज सिताराम कचरे (वय ३७, रा. धानकान्हे ता. रोहा) यांना तुम्ही केलेल्या पाईप लाईनचे काम व्यवस्थित नाही अशी बातमी पेपरला प्रसिद्ध करतो अशी भीती दाखवून धमकी देत वेळोवेळी पैसे स्वरूपात खंडणीची मागाणी केली. फिर्यादी कचरे याच्याकडून आरोपी येलकर याने आतापर्यंत ९ हजार रुपये गुगल पे द्वारे स्विकारले आहेत. तरी देखील आरोपीकडून अधिक रकमेची मागणी सुरूच होती. आरोपीने धाकदपट करून फिर्यादीकडे पैशांची मागणी केल्याने राजेश येलकर याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

राकेश येलकर या यूट्यूब चॅनलच्या तोतया, बोगस पत्रकार, संपादकावर रोहे पोलीस ठाण्यात आरोपीचा इतिहास पाहता याआधीही गु.र.नं. ६९/२०२२ भादवी कलम ३५३, ५०६ तर गु.र.नं २२/२०२३ भादवी कलम ४९८अ, ३२३, ५०४, ५९६ आणि गु.र.नं. ११८/२०२४ भादवी कलम मुंबई पोलीस अधी.चे कलम १४२ अन्वये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, झालेल्या या घटनेबाबत शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजी काँ.गु.र.नं. १५६/२०२४ भारतीय दंड संहिताचे कलम ३८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप तरी फरार आहे. तर रोह्याचें पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. निरीक्षक ए. आर. रावडे यांच्यासह सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत. मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्या बोगस पत्रकारांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!