अब्दुल सोगावकर
सोगाव : प्रत्येक समाजाचा आदर करणारे व त्या समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपणारे अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सोगाव व चोरोंडे आदिवासी वाडीवर जाऊन सचिन घाडी मित्रमंडळ मूनवली यांच्यातर्फे वाडीवरील प्रत्येक गरीब आदिवासी कुटुंबाला रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान व सूचित थळे यांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वाटप केले.

जागतिक आदिवासी दिन असतानाही सकाळपासूनच पोटापाण्यासाठी व रोजंदारीकरिता घराबाहेर गेलेले आदिवासी बांधव संध्याकाळी घरी आल्यावर सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी या बांधवांना सुखद धक्का दिला. यावेळी सचिन घाडी यांचे या आदिवासी समाजाप्रती असलेली आत्मीयता, आपुलकी, प्रेम व बांधिलकी याचे अनोखे दर्शन यानिमित्ताने दिसले. त्यांनी सोगाव व चोरोंडे येथील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला मोठ्या प्रमाणात ब्लॅंकेटचे वाटप करत वयोवृद्ध, मुले, मुली, महिला व पुरुष यांना जागतिक आदिवासी दिनाच्या भरभरून शुभेच्छा देत वयोवृद्धांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या सोबत रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, सूचित थळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सचिन घाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते अक्षय नागावकर, गितेश ठकरुळ, साजिद कुर व इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्लॅंकेटचे वाटप झाल्यानंतर सचिन घाडी मित्रमंडळाचे सदस्य अक्षय नागावकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.