• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शेकापच्या उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीसपदी जितेंद्र म्हात्रे

ByEditor

Aug 12, 2024

घनःश्याम कडू
उरण :
शेतकरी कामगार पक्षाच्या उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीस पदी न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन माजी आ. बाळाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी आदींनी केले.

जितेंद्र म्हात्रे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम निष्ठेने केले. या त्यांच्या कार्याची नोंद शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने घेतली. यामुळे येणार्‍या विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी अजून जोमाने काम करावे, यासाठी त्यांची उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीस या पदावर निवड करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!