• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून रचला इतिहास

ByEditor

Aug 30, 2024

पॅरिस : भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीने अंतिम फेरीत २४९.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीसोबतच भारताच्या मोना अग्रवाल हिनेही कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. अवनीचा हा विजयही ऐतिहासिक आहे कारण तिने नवा पॅरालिम्पिक विक्रम केला आहे.

अवनी लेखरा आणि दक्षिण कोरियाच्या युनरी ली यांच्यात शेवटच्या शॉटपर्यंत अत्यंत चुरशीची लढत झाली. अवनी शेवटच्या शॉटपर्यंत रौप्य पदकाच्या स्थानावर राहिली, पण तिने शेवटच्या शॉटवर १०.५ गुण मिळवे. त्याच वेळी, कोरियन नेमबाज शेवटचा शॉट चुकला, तिला फक्त ६.८ गुण मिळाले. यामुळे कोरियन शूटरचा अंतिम स्कोअर २४६.८ इतकाच राहिला.

अवनी लेखराने तिचाच विक्रम मोडला
अवनी लेखरा वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. तेथे तिने अंतिम फेरीत २४९.६ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले होते आणि पॅरालिम्पिकचा नवा विक्रम प्रस्थापित केला. आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अवनीने २४९.७ गुण मिळवत स्वतःचा विक्रम सुधारत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या वेळी टोकियो पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेती चीनची क्युपिंग झांग हिने कांस्य पदक जिंकले.

अवनी लेखरा आता सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे. तिच्याआधी, आजपर्यंत भारताच्या एकाही नेमबाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!