• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘मुंबई इंडियन्सबरोबरचा रोहित शर्माचा प्रवास संपला’ दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ

ByEditor

Sep 11, 2024

मुंबई : आयपीएल 2025 साठी बराच अवधी असला तरी आतापासूनच अनेक घडामोडी घडत आहेत. नव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सचा हुकमी खेळाडू सूर्यकुमार यादव आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सबरोबरचा प्रवास संपला असून आयपीएलच्या पुढच्या हंगामात रोहित नव्या संघातून खेळतान दिसेल असं वक्तव्य एका दिग्गज खेळाडूने केलं आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवर आकाश चोप्राने मोठी घोषणआ केली आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सबरोबरचा प्रवास संपला असल्याचा दावा आकाश चोप्राने केला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्राने वक्तव्य केलं आहे. आकाश चोपडाच्या मते मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार नाही. नव्या हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावात मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करेल, पण लिलावात रोहित शर्मा उपलब्ध नसेल. कारण ट्रेड विंडोच्या माध्यमातून तो दुसऱ्या संघात जाईल असा दावाही आकाश चोप्राने केला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. पण आयपीएलच्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी करत हार्दिक पांड्याची नियुक्ती केली. पण यामुळे मुंबईकर क्रिकेट चाहते चांगले नाराज झाले आणि त्यांनी हार्दिक पांड्याला मैदानात आणि मैदानाबाहेरही चांगलंच ट्रोल केलं. या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरीही निराशाजनक होती. पॉईंटटेबलमध्ये मुंबई तळाला होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!