• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भेंडखळ गावातील साकवाचा पाया ढासळला

ByEditor

Sep 27, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
भेंडखळ गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या पायाची हळूहळू पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री सदर साकव केव्हाही पडून रहदारी करणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती भेडखळ गावातील रहिवासी व्यक्त करत आहेत.

भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या ग्रामपंचायत फंडातून, सिडको तसेच इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावली जात आहेत. परंतु रहिवाशांच्या रहदारीसाठी महत्वाचा असलेल्या गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करण्यास कोणालाही वेळ मिळत नाही. त्यामुळे साकवाचा पाया हळूहळू कमकुवत होत चालला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर रात्री अपरात्री सदर साकव पडून रहदारी करणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करु शकतो अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

या अगोदर फुंडे व धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील साकव पडून एका कामगाराचा तसेच मासेमारीसाठी गेलेल्या आदिवाशी बांधवांचा मुत्यू झाल्याची घटना घडली होती. तरी ती पुनरावृत्ती पुन्हा घडू नये यासाठी सदर साकवाचे दुरुस्तीचे किंवा नव्याने काम हाती घेण्यात यावे.
-शिवाजी ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते भेंडखळ

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!