अमुलकुमार जैन
अलिबाग : तक्रारदार शिक्षकाची वैद्यकीय बीले मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच घेताना वेतन व भविष्य निर्वाहन पथकाचा कर्मचारी संदीप शामराव गोळे यास आज रायगड अँटी करपशन विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे शिक्षक आहेत. आरोपी संदीप वेळे पेण जवळील वाक्रुळ शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करत असून त्याची तात्पुरती नेमणूक वेतन व भविष्य निर्वाहन पथकामध्ये करण्यात आली होती. तक्रारदार शिक्षक यांचे पूर्वी मंजूर केलेले वैद्यकीय बिल अदा केल्याच्या मोबदल्यात दीड हजार रुपये व फेब्रुवारी २०२२ या महिन्याचे थकीत वेतन बिल मंजुरी करण्याकरिता पाचशे अशी एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी आरोपीने केली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी रायगड अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती. रायगड अँटी करप्शनचे उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.