• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाजपला पुण्यात सर्वात मोठा धक्का ; संजय काकडेंसह आजी-माजी आमदार, नगरसेवक फुंकणार तुतारी

ByEditor

Oct 11, 2024

पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅ क्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धनर्ध पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला सुरुंग लावणार आहेत. शरद पवार पुण्यात भाजपला सर्वात मोठा धक्का देणार आहेत. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्यासह २० नगरसेवकांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेणार आहेत. या पक्ष प्रवेशाबाबत स्वत: संजय काकडे यांनी माहिती दिलीय.

संजय काकडे हे दसऱ्यानंतर अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत. मागील काही दिवसांपासून संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान संजय काकडे हे पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते सुरुवातीला अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. २०१९ आणि २०२४ मध्ये पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नव्हती

दहा वर्षे मी पक्षासाठी खूप काम केलं आहे, पक्षाने माझा कुठेही विचार केला नाही. पुणे शहरामध्ये माझ्यासह कार्यकर्त्याची गळचेपी झाल्याची खदखद काकडे यांनी बोलून दाखवली. दरम्यान, हा भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. समरजितसह घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता संजय काकडे भाजपची साथ सोडणार आहेत. गेल्या १० वर्षांत पक्षाकडून काहीही मिळालं नाही. भाजपकडून फक्त वापर झाल. फक्त औपचारिक्तेसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय काकडे यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!