• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या

ByEditor

Oct 12, 2024

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे.

माहितीनुसार, त्यांच्यावर तीन व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. 12 ऑक्टोबर (शनिवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर एसआरए प्रकल्पातून गोळीबार झाला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!