• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड मेडिकल असोसिएशनच्या इनडोअर स्पर्धा संपन्न

ByEditor

Oct 16, 2024

डॉक्टरांनी व्यस्त कार्यक्रमातून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे -डॉ. निशिगंध आठवले

अमुलकुमार जैन
रायगड :
आरसीएफ क्रीडा संकुलमध्ये रायगड मेडिकल असोसिएशनच्या इनडोअर स्पर्धा व महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “डॉक्टरांनी देखील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे व आपल्या आवडीचे खेळ खेळून जीवनाचा आनंद घ्यावा असे रायगड मेडिकलचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील सर्व सुप्रसिद्ध डॉक्टरांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. रनिंग, स्विमिंग, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस व महिला क्रिकेट अशा प्रकारच्या सर्व स्पर्धांचे आयोजन खूप चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात रायगड मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. राजेंद्र चांदोरकर, खजिनदार डॉ. नवलकिशोर साबू, माजी अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. घनश्याम पाटील, अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन अध्यक्षा डॉ. सुनिता पाटील, माजी अध्यक्ष डॉ. गणेश गवळी, डॉ. मयूर कल्याणी व इतर मान्यवर तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

रायगड मेडिकल असोसिएशन स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा स्पोर्ट्स एडमिन कमिटी डॉ. राजेश शिंदे व टीम यांच्या सहयोगाने उत्तमरीत्या कोणालाही कसली इजा न होता ह्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. स्पर्धेचे उद्घाटन आरसीएफ कार्यकारी संचालक नितीन हिरडे, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे व अलिबाग – रायगड, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. मकरंद आठवले यांनी उत्तमरीत्या सूत्रसंचालन केले. डॉ. वसीम पेशिमाम व डॉ. राजाराम हुलवान यांनी आरसीएफ क्रीडा संकुल तसेच उपस्थित मान्यवर व जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!