• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘पिपाणी’मुळे शरद पवारांचे नऊ उमेदवार पडले? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘तुतारी’चं नुकसान

ByEditor

Nov 25, 2024

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. या चिन्हावर या पक्षाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक लढवली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी या चिन्हाशी साम्य असलेल्या ‘पिपाणी’ या चिन्हाचा फटका बसल्याचं बोललं जात होतं. शरद पावारांच्या पक्षाचे उमेदवार ज्या मतदारसंघात उभे होते, तिथे काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीत हे चिन्ह असलेल्या अनेक अपक्षांना हजारो-लाखो मतं मिळाली होती. यामुळे शरद पवारांचा साताऱ्यातील शिलेदार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं राष्ट्रवादीमधील (शरद पवार) नेत्यांचं म्हणणं होतं. यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र, आयोगाने त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे.

पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव आहे. तसेच या चिन्हांमध्ये साम्य आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. दरम्यान, या पक्षाने आता ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी देखील होती. होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही वेगवेगळ्या मतदारसंघातील अनेक अपक्ष उमेदवारांना व लहान पक्षांच्या उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह मिळालं होतं. या उमेदवारांनी हजारो मतं देखील मिळवली. जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा मतदासंघात शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला, त्यापेक्षा अधिक मतं पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाली आहेत. या मतांचं विभाजन झालन नसतं तर कदाचित शरद पवारांच्या पक्षाचे १९ आमदार निवडून आले असते, असं मत या पक्षातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे.

क्र.मतदारसंघविजयी उमेदवार व त्याला मिळालेली मतंराष्ट्रवादीचा (शरद पवार) उमेदवार व त्याला मिळालेली मतंविजयी उमेदवाराचं मताधिक्यअपक्ष उमेदवार व त्याला मिळालेली मतं
(निवडणूक चिन्ह पिपाणी )
1शहापूरदौलत दरोडा – ७३,०८१पांडुरंग बरोरा – ७१,४०९१८७२रमा शेंडे – ३,८९२
2बेलापूर मंदा म्हात्रे – ९१,८५२ संदीप नाईक – ९१,४७५ ३७७प्रफुल्ल म्हात्रे – १,८६०
3अणुशक्ती नगरसना मलिक – ४९,३४१फहाद अहमद – ४५,९६३३३७८जयप्रकाश अगरवाल – ४,०७५
4जिंतूरमेघना बोर्डीकर – १,१३,४३विजय भांबळे – १,०८,९१६४,५१६विनोद भावळे – ७,४३०
5घनसावंगीहिकमत उधाण – ९८,४९६राजेश टोपे – ९६,१८७२,३०९बाबासाहेब शेळके – ४,८३०
6आंबेगावदिलीप वळसे पाटील – १,०६,८८देवदत्त निकम – १,०५,३६५१,५२३देवदत्त शिवाजी निकम २,९६५
7परांडातानाजी सावंत – १,०३,२५४राहुल मोटे – १,०१,७४५१५०९जमील खानव – ४,४४६
8पारनेरकाशिनाथ म्हादू दाते – १,१३,६३०राणी लंके – १,१२,१०४१,५२६सखाराम सरक – ३,५८२
9केजनमिता मुंदडा – १,१७,०८१पृथ्वीराज साठे – १,१४,३९४२,६८७अशोक थोरात – ३,५५९

सातारा लोकसभेतही नुकसान
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे ३२ हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात पिपाणी या निवडणूक चिन्हासह लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला ४७ हजार मतं मिळाली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!