• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, ‘या’ आजारांवरही रामबाण

ByEditor

Jan 11, 2025

रायगड जनोदय ऑनलाईन
हिवाळ्यात पेरू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पेरु चवीला तर चांगला लागतोच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेकजण लोक हिवाळ्यात उन्हात बसून पेरू खातात. पेरुत अनेक पोषकतत्वे असतात. तसंच, त्वचेसाठीही पेरू खूप फायदेशीर आहे. काही जण पेरूच्या बिया फेकून देतात किंवा खात नाहीत. पण पेरुतही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पेरुच्या बियात कोणते गुणधर्म असतात, हे जाणून घेऊया.

पेरूच्या बियांमध्ये असणारी पोषक तत्वे

पेरूच्या बियांचे सेवन केल्यास पचनसंस्था मजबूत होते. बियांमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते जे पाचनसंस्था सुधारण्यास मदत करते. पेरुच्या बियांचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळते. त्यामुळं हिवाळ्यात पेरुचे सेवन आवश्यक करावे.

वजन कमी करण्यासाठी

पेरुच्या बियांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. कारण पेरुत कोलेस्ट्रोलची मात्रा खूप कमी आहे. बियांमध्ये फायबर मोठ्याप्रमाणात असते त्यामुळं पेरु खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळं जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पेरु नक्की खायला पाहिजे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरु खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीनची मात्रा अधिक असते. जी शुगर आणि शुगर कपाउंड तोडण्यास मदत करते. त्यासाठी पेरुचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.

पेरुची पाने खाणेही प्रभावी

पेरुची पाने ही नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. त्यामुळं शरीर निरोगी राहते. पेरुच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीबॅक्टिरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यासोबतच यामध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्ट आणि टॅनिन ही रसायने आढळतात. जे विविध रोगांवर उपचार करण्यास प्रभावी ठरतात. अनेक ठिकाणी पेरुच्या पानांचा रस औषध म्हणून करतात. जपानमध्ये लोक हर्बल टी बनवण्यासाठी पेरुच्या पानांचा वापर करतात.

(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!