• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी शुभमन गिलची वर्णी

ByEditor

Jan 18, 2025

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुभमन गिलची वर्णी लागली आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण वेळापत्रक –

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. उभय संघांमधील सामना २० फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना होणार आहे. टीम इंडिया २ मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारताने गट सामन्यांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आणि पुढील फेरीत प्रवेश केला तर ४ मार्च रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे.

भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने –

२० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
२ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
४ मार्च: उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास), दुबई
९ मार्च: अंतिम (पात्र असल्यास), दुबई

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!