रोजच जेवण खाऊन कंटाळा आलाय ? काहीतरी चटपटीत खाण्याचा मोह होत आहे. तर खानदेशी पद्धतीची शेव रस्सा भाजी बनवा. चिकन, मटण देखील तुम्ही विसरून जाल. एवढी झणझणीत भाजी बनेल. शेव रस्सा भाजीही पारंपारिक पदार्थ आहे. सहज, सोपी रेसिपी जाणून घ्या.
झणझणीत शेव रस्सा रेसिपी
साहित्य
- कांदा
- लसूण
- आलं
- तिखट शेव
- सुक खोबरं
- कोथिंबीर
- हिरव्या मिरची
- तेल
- पाणी
- मसाले (काळा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, तमालपत्र, वेलची, दालचिनी, हळद, जिरे, लवंग)
कृती
झणझणीत शेव रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कांदा आणि सुक खोबरं छान भाजून घ्यावे. त्यानंतर दोन्ही गोष्टी थंड झाल्यावर कांदा कापून घ्यावा आणि खोबरं बारीक कापून घ्यावे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, आले, हिरवी मिरची आणि सर्व मसाले टाकून थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यावी.
आता दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये हळद, जिरे टाकून बनवलेली पेस्ट घालून मिश्रण छान परतून घ्यावे. भाजीला छान तेल सुटू लागल्यावर अर्धा कप पाणी टाकून उकळी येऊ द्यावी. शेवटी यावरती कोथिंबीरने सजावट करा. आता एका बाऊलमध्ये ही भाजी घेऊन त्यावरती तिखट शेव टाका. भाकरी आणि गरमागरम चपातीसोबत या मसालेदार भाजीचा आस्वाद घ्यावा.