• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा, आमदारकी जाणार?

ByEditor

Feb 20, 2025

नाशिक : अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. 1995 मधील एका प्रकरणात कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोकाटे यांचे विधिमंडळ सदस्यता धोक्यात आली असून त्यांचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे बंधूंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तीस वर्षांनी हा निकाल लागला असून कोकाटेंच्या अडचणीत भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी 30 वर्षांनी नाशिक सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यानुसार कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कोकाटे अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास आमदार वा खासदारकी रद्द होते. त्यामुळे कोकाटे यांना तातडीने वरील न्यायालयात जाऊन शिक्षेला स्थगिती मिळवावी लागेल. अन्यथा कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!