• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गावच्या सरपंचाकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नाशिक जिल्ह्यातील विटावे गावातील घटना

ByEditor

Mar 1, 2025

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात विटावे गावात सरपंचाने दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच पदाला काळिमा फासणारी घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे.

विटावे गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागु कोल्हे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सरपंचाने दोन्ही मुलींना ब्रम्हगिरी लॉज (त्र्यंबकेश्वर) नाशिक, शिर्डी (अहिल्यानगर) व विटावे येथे घेऊन जाऊन वेळोवेळी बलात्कार केला आहे. यासाठी त्याने मुलींच्या आजीचीच मदत घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान सदर प्रकरणात दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिने सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्या सोबत मुलींना जाण्यास सांगितले, मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला. यामुळे आजीने चिडून मुलींना मारहाण करुन दोघींना चावा घेतला. इतकेच नाही तर शिवीगाळ दमदाटी करुन दोघीना घरात कोंडून ठेवले होते.अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला दिली आहे.

यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील सरपंच साईनाथ नागु कोल्हे, साथीदार संजय त्र्यंबक पवार व मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे या तीघाविरोधात बालकांचे लैगिक अपराध पोक्सो व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!