मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
मात्र, लाडक्या बहिणींना २१०० मिळणार की नाही याबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली नाही. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
यानंतर विधानसभेत अजित पवारांना २१०० रुपये देणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्प होऊ द्या, मग सांगतो. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.