• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिपळूणमधील तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी म्हसळा नाभिक समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन

ByEditor

Aug 4, 2023

वैभव कळस
म्हसळा :
दापोली येथील स्टेट बँकेत काम करणाऱ्या चिपळूण येथील ओमळी येथील तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी म्हसळा तालुका नाभिक समाजातर्फे तहसीलदार म्हसळा यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नीलिमा सुधाकर चव्हाण (वय -२४ वर्षे.मु. ओमळी, ता. चिपळूण. जि. रत्नागिरी) हि स्टेट बँकेच्या दापोली शाखेत काम करीत होती. तीचा संशयास्पद मृत्यू झाला, तीचा मृतदेह दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी विद्रुप अवस्थेत दाभोळच्या खाडीत सापडला. या वृत्ताने संपूर्ण रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून रत्नागिरी सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात या घटनेचा तीव्र निषेध होऊन आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. म्हसळा तालुक्यातही तालुका नाभिक समाजातर्फे तहसीलदार समीर घारे यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी नाभिक समाज माजी अध्यक्ष प्रदिप कदम, दीपल शिर्के, सुनील भोसले, महेश खराडे, रुपेश नथुराम पवार, वैभव जाधव, प्रशांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!