• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वैष्णवीचा अमानुष छळ, मृत्यूआधी 6 दिवस मारहाण? अंगावर 29 जखमा, धक्कादायक रिपोर्ट समोर

ByEditor

May 27, 2025

पुणे: पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आता समोर आला असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर 29 जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी 15 जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणात पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी सोमवारी दिले.

वैष्णवीच्या अंगावर एकूण 30 जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी 29 जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत. 15 जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत. एक जखम मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधी झाली आहे. 11 जखमा या मृत्यूपूर्वी 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या आहेत. दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वैष्णवीला पाईपने मारहाण केली तो पाईप पोलिसांनी जप्त केला आहे. एक दुचाकी, हुंड्यात मिळालेली महागडी मोटार, चांदीची भांडी, दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. पाच आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत,

दरम्यान, आरोपींनी हुंड्यामध्ये मिळालेले 51 तोळे सोन्याचे दागिने एका बँकेत तारण ठेवले आहे. दागिने तारण ठेवण्यामागचे कारण काय ? या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील नितीन अडागळे यांनी युक्तिवादात केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!