• Sat. Jun 7th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खोपटा रस्त्यावर रासायनिक कंटेनर उलटला; रिक्षामधील प्रवाशी थोडक्यात बचावले

ByEditor

Jun 7, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
खोपटा-कोप्रोली रस्त्यावरील ऑल कार्गो कंटेनर यार्डजवळील भागात शनिवारी सकाळी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या रिक्षामधील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. सदर अपघात हा जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या साईडपट्टीमुळे झाला असल्याचे दिसून येत आहे.

उरण जेएनपीटी येथून खोपटा, कोप्रोली, मोठी जुई, पिरकोण या ठिकाणी असलेल्या गोदामात अवजड वाहनांची वाहतुक होते. ही वाहने खोपटा पुलावरून ये-जा करत असतात. खोपटा ते चिरनेर या रस्त्यावरील साईडपट्टी ही खोपटा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आली आहे. मात्र, सदर साईडपट्टी ही ठेकेदारांनी जैसे थे स्थितीत ठेवल्याने या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना अपघाताला कारणीभूत ठरत आहे. बुधवारी रासायनिक कंटेनर घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाला खोदण्यात आलेल्या रस्त्यावरील साईडपट्टीचा अंदाज न आल्याने सदरचा अपघात झाला आहे. या अपघात रस्त्यावरुन मार्गक्रमण करत असलेल्या रिक्षामधील प्रवाशी थोडक्यात बचावले. तरी या अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!