• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आईला म्हणाला, ‘लवकरच जेवायला घरी येतो’ अन् ओंकारने अटल सेतूवन मारली उडी; शोध मोहीम सुरूच

ByEditor

Jul 9, 2025

नवी मुंबई : ३२ वर्षांचे डॉ. ओंकार कवितके, जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते, सोमवारी रात्री (७ जुलै) अचानक रुग्णालयातून निघाले आणि आपल्या आईला फोनवर सांगितले—“लवकरच जेवायला घरी येतो.” मात्र ते कळंबोलीमधील आपल्या निवासस्थानी कधीच पोहोचले नाहीत.

दरम्यान, रात्री सुमारे ९.३० ते १० च्या दरम्यान, त्यांनी अटल सेतूवर त्यांची होंडा अमेझ कार थांबवली आणि पुलाच्या कठड्यावरून थेट खाडीत उडी मारली. घटनेच्या ठिकाणी उलवे पोलीस पोहोचले असता, त्यांना गाडी आणि ओंकारचा आयफोन सापडला. मोबाईलमधून प्राप्त झालेल्या माहितीवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला.

डॉ. ओंकार मागील सहा वर्षांपासून जे. जे. रुग्णालयात कार्यरत होते आणि आईसोबत कळंबोली परिसरात राहत होते. घटनेच्या कारणांबद्दल अद्याप स्पष्टता नसून पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांशी चौकशी करण्यात येत आहे.

उलवे पोलीस निरीक्षक अर्जून राजे यांच्या माहितीनुसार, ओंकारचा शेवटचा फोन आईला रात्री ९.११ वाजता झाला होता, ज्यामध्ये त्यांनी “जेवायला येतो” असे सांगितले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मच्छिमार आणि नागरिकांना मृतदेह सापडल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत मृतदेह सापडलेला नसून शोध कार्य सुरूच आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!