• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ट्रक-मॅजिकची जोरदार धडक; १० जणांचा जागीच मृत्यू

ByEditor

Aug 11, 2023

गुजरात : गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मिनी ट्रकमधून मृतदेह काढले.

मिळालेल्या वृत्तानुसार, अहमदाबादमधील बावला-बगोदरा महामार्गावर शुक्रवारी सकाळी एका मिनी ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. चोटिला मातेचे दर्शन करून परतणारा एक मॅजिक महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. मृतांमध्ये पाच महिला, तीन मुली आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मॅजिकमध्ये जवळपास १३ लोक बसलेले होते. हे सर्व लोक सुरेंद्र नगर जिल्ह्यातील चोटिलावरून परतत होते. याच दरम्यान महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मॅजिक धडला. अपघातानंतर बावला-बगोदरा महामार्ग जाम झाला होता, असे सांगण्यात येत आहे. या मिनी ट्रकचा वेग इतका होता की अपघातामध्ये या ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला. दरम्यान, संबंधित ट्रक टायर पंक्चर झाल्याने महामार्गावर उभा होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!