• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चंद्राच्या जवळ पोहोचलो; चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट, या दिवशी होणार ‘सॉफ्ट लँडिंग’

ByEditor

Aug 14, 2023

नवी दिल्ली: भारताची चांद्र मोहिम चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट आली आहे. इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. सोमवारी चांद्रयान-३ची कक्षा बदलण्यात आली. इस्रो (Isro)ने दिलेल्या माहितीनुसार यान आता चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. चांद्रयान-३चे प्रक्षेपण १४ जुलै रोजी करण्यात आले होते आणि पाच ऑगस्ट रोजी यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर दोन वेळा चांद्रयान-३ ला चंद्राच्या जवळ आणण्याची प्रक्रिया पार पाडली होती.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ची चंद्रापासूनची कक्षा १५० किमी X १७७ किमी इतकी करण्यात आली आहे. आता १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजता आणखी एकदा कक्षा बदलली जाईल. चांद्रयान-३ ला चंद्राच्या १०० किमी इतक्या अंतरावर आणले जाईल आणि त्यानंतर लँडर आणि रोव्हरचे प्रॅपल्शन मॉड्यूल वेगळे केले जाईल. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचे सॉफ्ट लँडिंग केले जाईल.

रशियाचे लूना-२५ नंतर भारताच्या चांद्रयान-३ चंद्राच्या भूमीवर उतरण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, चांद्रयान-३ हे लूना-२५ पेक्षा लांबच्या मार्गाने प्रवास करत आहे. चांद्रयान-३ चा प्रवास हा पृथ्वी आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून केला जात आहे. यामुळे यान कमी इंधनात प्रवास करू शकते.

भारताच्या या मोहिमेवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरले. चंद्राच्या भूमीवर अवघड अशी सॉफ्ट लँडिंग करण्याचे कौशल्य मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. चांद्रयान-२ मोहिमेत इस्रोला सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. तेव्हा ७ सप्टेंबर २०२९ रोजी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगच्या वेळी ब्रेकिंग प्रणालीत झालेल्या गडबडीमुळे चंद्राच्या भूमीवर क्रॅश झाले होते. इस्रोने २००८ साली चांद्रयान-१ मोहिम सुरु केली होती. गेल्या पंधरा वर्षातील भारताची ही तिसरी चंद्र मोहिम आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!