• Thu. Apr 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोठी बातमी! बारावीचा निकाल 2 मे ला जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहता येणार निकाल?

ByEditor

Apr 30, 2026

मुंबई : बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बारावी इयत्तेचा निकाल शनिवारी, २ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.

2026 या वर्षात 14,17,969 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या HSC बारावीची परीक्षा दिवी. सुमारे 14.27 लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरले होते. प्रत्यक्ष 14.17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जवळपास 14 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते.

बारावीचा निकाल कसा पहायचा?

अधिकृत वेबसाईटवरून बारावीच्या निकाल पाहता येणार आहे. मोबाईल/कॉम्प्युटरवर ब्राउझरवर Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
HSC Examination Result 2026” या लिंकवर क्लिक करा
तुमचा Seat Number (बैठक क्रमांक) आणि Mother’s First Name (आईचं नाव) टाका
View Result” किंवा “Submit” बटणावर क्लिक करा. निकालाची प्रत येथे दिसेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!