• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल होणार जाहीर, ‘या’वेबसाईटवर पाहा निकाल

ByEditor

May 8, 2026

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Result 2026) आज, ८ मे रोजी, दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी अकरा वाजता एक पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन संकेतस्थळांनर हा निकाल पाहता येईल. आज सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात निकालासंबंधीची अधिकृत पत्रकार परिषद पार पडेल.

कुठे पहाल दहावीचा निकाल?

खालील संकेत स्थळांवर तुम्ही पाहू शकता दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Result 2026)

https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.digilocker.gov.in
https://results.navneet.com
https://results.targetpublications.org/
https://mahahsscboard.in

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असून, राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे.

गेल्या काही वर्षांत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचा निकाल विक्रमी वेळेत जाहीर केला आहे. यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर केल्यानंतर, त्यापाठोपाठ आता ८ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी साधारणत: जून महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला जायचा. मात्र, अलीकडे दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत जाहीर झाल्यामुळे, विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया घेण्यास आणि शैक्षणिक वर्षाची वेळेत सुरुवात होण्यास मदत होत आहे. आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अकरावीची प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू करतील.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!