• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सचिन मोदी…तरुण, डॅशिंग नेतृत्व! सामान्य लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता

ByEditor

Sep 4, 2023

नागोठणे हे शहर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहराचे राजकीय महत्व पण खूप आहे. नागोठणाचे भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी हे अगदी लहानपणापासूनच आमदार रवीशेठ पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेले अनेक वर्ष काम करत आहेत. दर गुरुपौर्णिमेला ते आमदार रवीशेठ पाटील व माझे न चुकता आशीर्वाद घेत असतात. सचिन मोदी यांना राजकीय वारसा असून त्यांचे काका मुलचंदशेठ मोदी हे नागोठणे विभागातील ज्येष्ठ नेते होते व जुन्या काळात पण त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. सचिन मोदी हे उच्च शिक्षित असून त्यांचा चांगला व्यवसाय आहे तरीपण लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्य करण्याची आवड आहे.

नागोठणे शहरात भाजप पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. नागोठण्यातील विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच सक्रिय असतात. रोटरी इंटरनॅशनल क्लब यांची नागोठण्याची शाखा स्थापन करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष राहून पण त्यांनी खूप सारी समाजोपयोगी कामं केली आहेत. कोरोना काळात नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी शेड बांधून व खुर्च्या देऊन लस घेण्यासाठी लोकांची खूप सोय करून दिली तसेच लोकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी केंद्र काढून दिले. कोरोना काळात कितीतरी लोकांना धान्य वाटपही त्यांनी केले. नुकतेच त्यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोटरी क्लबतर्फे बेबी वॉर्मर देऊन लहान मुलांच्या उपचाराची सुद्धा सोय केली.

पोलीस हे सतत समाजासाठी झटत असतात याच कारणासाठी ते नेहमीच पोलीस व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर ठेवत असतात. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्यावेळी साधे पंखे पण चालू नव्हते त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते त्यावेळी त्यांनी जिल्हा पातळीवर प्रयत्न करून सर्व पंखे चालू स्थितीत आणून रुग्णांना दिलासा दिला.

नागोठणे गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तुटली होती. त्यावेळी मी सुचवल्याप्रमाणे त्यांनी निस्वार्थपणे स्वखर्चातून संपूर्ण नागोठणे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. एवढ्यावरच न थांबता नागोठणे व नागोठणे विभागातील पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी त्यांनी आमदार रवीशेठ पाटील यांना साकडे घालून पाण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावून अधिकारी वर्गांना धारेवर धरले.

नागोठणे गावाचा फिल्टर पाण्याचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. जल जीवन मिशनचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन हा सदर प्रश्न आमदार रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सुटावा म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. सचिन मोदी यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन यावर्षी रोटरी इंटरनॅशनल क्लबमध्ये ते डिस्ट्रिक्ट कमिटीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून त्यांची निवड झाली आहे.

नागोठणे गावातील विविध प्रश्न ते आमदार रवीशेठ पाटील यांच्यापर्यंत व्यवस्थित आणि सातत्याने मांडत असतात. आमदार रवीशेठ पाटील यांचे देखील नागोठण्यावर विशेष प्रेम असून या विभागातील विकासकामांना वेळोवेळी निधी दिला आहे. भाजप पक्ष म्हणून आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून नागोठणे शहराचा विकास करू. अशा या आमच्या लाडक्या तरुण नेत्याला दीर्घायुष्य लाभो व त्याच्याकडून सामान्य लोकांचे प्रश्न सातत्याने सुटावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

श्री. वैकुंठ रवीशेठ पाटील
उपाध्यक्ष, दक्षिण रायगड भाजपा

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!