• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

ByEditor

Nov 29, 2023

मिलिंद माने
मुंबई :
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार असल्याचे आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.

विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, संबंधित मान्यवर उपस्थित होते.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या (शनिवार व रविवार) ४ दिवस असा अधिवेशनाच कामकाज असणार असल्याचे आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!