• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश, 27 फेब्रुवारीला मतदान

ByEditor

Jan 29, 2024

नवी दिल्ली: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 27 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपत आहे. 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

29 फेब्रुवारीला चित्र होणार स्पष्ट
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर आमदार कोणाला मतदान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकांची एकूण प्रक्रिया 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 27 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 29 फेब्रुवारीला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपत आहे. ओडिशा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 ला संपणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!