नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 8 मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 39 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांचा समावेश होता. आता काँग्रेस आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 57 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी स्क्रीनिंग समिती 2 दिवस उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करत होती. त्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. मात्र, दुसऱ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश होता.
नंदुरबार – गोवाळ पाडवी
अमरावती – बळवंत बसवंत वानखेडे
नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण
पुणे – रविंद्र हेमराज धंगेकर
लातूर – डॉ. शिवाजीराव काळगे
सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू शहाजी छत्रपती