• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मधाचे १५ मोठे फायदे, जे कदाचित माहिती नसतील तर…जाणून घ्या

ByEditor

May 30, 2024

मध हे फ्रक्टोज, ग्लूकोज, सुक्रोज, माल्टोज आणि शर्कराचे मिश्रण आहे. यामध्ये ७५ टक्के साखर असते. तसेच यात व्हिटॅमिन, रायबोफ्लेवन, व्हिटॅमिन ए, बी-१, बी-२, बी-३, बी-५, बी-१२ तसेच सी, व्हिटॅमिन एच, प्रोटीन, एलब्यूमिन, चरबी, एंजाइम अमीनो अ‍ॅसिड, आयोडीन आणि लोह, तांबे, मॅगनीज, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, क्लोरिन ही शरीरासाठी आवश्यक तत्त्वे असतात. अशा गुणकारी मधाचे असेही काही उपयोग आहेत जे अनेकांना माहिती नसतात. अशाच काही उपयोगांची माहिती आपण घेणार आहोत.

भाजणे
चटका लागला किंवा पोळले तर त्या ठिकाणी मध लावावे. जळलेल्याची खुन राहणार नाही.

लठ्ठपणा
वजन कमी करण्यासाठी मध चांगला उपाय आहे. साखरेऐवजी मधाचा उपयोग करा. वाढणारे वजन खुप लवकर नियंत्रणात येते.

त्वचा
शरीराची त्वचा स्वच्छ करण्यासाठी तीन चमचे मधामध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळून अंघोळीच्या पाण्यात टाका. स्किनला नॅचरली मॉश्चराइज होते. स्किन ग्लो करायला लागेल.

तणाव
तणाव असल्यास चहामध्ये एक थेंब मध टाकून प्या. रिलॅक्स फील कराल.

हँगओव्हर
हँगओव्हर झाला असेल तर ब्रेकफास्टमध्ये मध लावलेला टोस्ट आणि चहामध्ये मध टाकून प्या. शरीराचे मॅटाबॉलिज्म चांगले होते ज्यामुळे अल्कोहोलचा प्रभाव नष्ट होतो.

नॅचरल फेसवॉश
दोन थेंब मध हातावर घ्या आणि त्यामध्ये दोन थेंब कोमट पाणी टाका. हे दोन्ही हातांनी क्लॉकवाइज मसाज करा. काही काळ ते तसेच राहू द्या आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. चेहरा चमकदार होईल.

अशक्तपणा
अशक्तपणा वाटेल तेव्हा एक चमचा मध खा. काही काळातच तुम्हाला एनर्जी येईल.

लिप बाम
बदाम तेल, बेस वॅक्स आणि मध या तिन्हींचे मिश्रिण करुन लिप बाम तयार करु शकता.

केसांसाठी
एक चमचा मधामध्ये एक चर्तुर्थांश चमचा पाणी टाका. हे मिश्रण शाम्पू करण्याअगोदर काही वेळा अगोदर केसांमध्ये लावा. यानंतर केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. केस खुप सिल्की आणि शायनी होऊ लागतील.

किटकनाशक
मध, व्हिनेगर आणि पाणी तिन्हीही समान प्रमाणात एकत्र करा. याचा वापर झाडांवर करा. हे एका नॅचरल किटनाशकाप्रामाणे काम करते.

पिंपल्स
पार्टीमध्ये जायचे असेल आणि पिंपल्स आले तर त्यावर थोडे मध लावा. हे अर्धाच तास लावून ठेवा. असे केल्याने पिंपल्स कमी होतील.

कफ
कफची समस्या असेल तर एक चमचा मधामध्ये लिंबूचा रस किंवा थोडेसे कोकोनट ऑइल टाकून घेतल्याने खुप फायदा होतो.

डायबिटीज
डायबिटीजमध्ये शुगर फ्रीच्या ऐवजी मधाचा उपोयग करावा. कारण मध ब्लड शुगर लेव्हल कमी करते.

निद्रानाश
नियमित २ ते ४ पर्यंत जागे राहत असाल म्हणजेच झोप न येण्याची समस्या असेल तर एक चमचा मधामध्ये थोडे मीठ टाकून सेवन करा. खुप गाढ झोप लागेल.

जखम
जखम झाल्यावर किंवा इजा झाल्यावर त्या ठिकाणी अँटीबायोटिक क्रीमच्या जागी मधाचा उपयोग करा. कारण मध एका नॅचरल अँटीबायोटिक प्रमाणे काम करते. हे जखमेवर नियमित लावल्याने जखम लवकर चांगली होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!