• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मग्नीराम जोशी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी अंतिम विजेता

ByEditor

Jun 6, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स आयोजित कै. मग्नीराम जोशी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी संघानी बाजी मारत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्च्या मैदानावर ज्युनियर वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत एकूण चार नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. त्यात किक फ्लिक क्रिकेट अकॅडमी खोपोली, प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल, एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी-सिंधुदुर्ग आणि पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी पनवेल अशा नामांकित संघांचा समावेश होता.

प्रथम लिग व नंतर बाद फेरीनुसार स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा अंतिम सामना एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी विरुद्ध प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल या दोन संघांमध्ये झाला. त्यामध्ये एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी संघानी प्रतीक क्रिकेट अकॅडमी संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ठ फलंदाजी करणाऱ्या सावंतवाडी संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज संचित गावडे याला सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून शौनक नाईक-सावंतवाडी, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक सुहान बांदेकर, आयुष सावंत – सावंतवाडी, इमार्जिग प्लेअर ईशान पाठक – प्रतीक क्रिकेट अकॅडमी पनवेल, उत्कृष्ठ यष्टीरक्षक अमोघ दिक्षित पीसीएए पनवेल, संपुर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या तनिष्का शर्मा – प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल हिला मालिकावीर म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य राजेश पाटील, ॲड. विकास पाटील, ॲड. पंकज पंडित, शंकर दळवी, संदीप जोशी, नरेंद्र शर्मा, सावंतवाडी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल रेगे, अविनाश जाधव, पीसीएसए प्रशिक्षक सागर कांबळे, विकास पवार, आदेश नाईक यांच्यासह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!