• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्त मजूरची शिक्षा

ByEditor

Jul 23, 2024

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सलीम शेख
माणगाव :
माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्तमजूरीची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील फिर्यादी या राहत असलेल्या ठिकाणाहुन त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार फिर्यादी यांनी दि. 21/7/2019 रोजी माणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केली. सदर फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याच्या तपासाअंती आरोपीने पीडित मुलीस त्याचे मूळ गावी सेल्फी नगर बिल्ला, तालुका बिलाह, जिल्हा जबलपूर, राज्य मध्य प्रदेश येथे पळवून नेल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. आरोपी व पीडित मुलीस सदर ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले असता पिडीत मुलीने तिचे इच्छेविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध ठेवल्याचे पोलिसांना आपल्या जबाबामध्ये सांगितले. त्यावरून माणगाव पोलिसांनी भा.द.वी.कलम 376 (3), 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3(अ),4,5 (एल), 6 प्रमाणे कलम वाढ करून गुन्हा दाखल केला.

सदर गुन्ह्यांचा तपास पी. पी. बुरुंगळे, महिला पोलीस उपनिरीक्षक माणगाव पोलीस ठाणे यांनी करून सदर गुन्ह्यांचे दोषारोप पत्र मा. जिल्हा सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. विशेष न्यायालय माणगाव-रायगड येथे झाली व सदर गुन्ह्यात पिडीत मुलीची साक्ष व फिर्यादी तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर खटल्यामध्ये अति. शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व कोर्टासमोर प्रभाविपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसाच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी दिनेश आघाव, पोलीस निरीक्षक छाया कोपनर मपोह, शिशीकांत कासार सहा. फौजदार, शिशिकांत गोविलकर पोह, सोमनाथ ढाकणे पोशी यांनी सहकार्य केले. तसेच मा. विशेष सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्ह्यांच्या शाबितीनंतर आरोपी नेताराम पुराणलाल चौधरी यास दोषी ठरवून दि 22/7/24 रोजी भा.द.वि.सं. कलम 376(3) अन्वये 20 वर्षे सक्त मजुरी व रुपये 50,000/- दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधा करावास, भा.द.वि. क. 376(2)एन अन्वये अन्वये 10 वर्षे सक्त मजुरी व रुपये 50,000/- दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधा करावास, भा.द.वि.कलम 363 अन्वये 5 वर्षे सक्त मजुरी व रुपये 25,000 /- दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधा करावासासह पोस्को कलम 4 अन्वये 20 वर्षे सक्त मजुरी व रु 50,000/- दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधा करावास, पॉक्सो कलम 6 अन्वये 20 वर्ष सक्त मजुरी व रुपये 50,000 दंड व दंड न भरल्यास 3 महिने सध्या करावासाची शिक्षा ठोठावली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!