रायगड जनोदय ऑनलाइन
मासिक पाळीच्या वेदना (Period Cramps) काही महिलांसाठी भयानक स्वप्नापेक्षा कमी नसतात. मासिक पाळी दरम्यान वेदना ही एक सामान्य समस्या आहे जी असंख्य मुलींना, स्त्रियांना दर महिन्याला भेडसावत असते (Women Health). प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जावे लागते. काहींना ते हलके दुखणे असते तर काहींना ते असह्य असते. ही वेदना (Period Cramps) संपूर्ण शरीरासाठी समस्या बनते. आज आम्ही अशाच काही उपायांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या वेदनांमध्ये मदत करू शकतात.
१. हलका शेक घ्या (Warm Compress Lightly) –
काहीवेळा पीरियड क्रॅम्प्समध्ये (Period Cramps) हलका शेक घेणे फायदेशीर ठरते. यासाठी, तुम्ही पोटाच्या खालच्या भागात हिटिंग पॅड किंवा शेक घण्याची बाटली ठेवा आणि आराम करा.
२. हायड्रेटेड रहा (Stay Hydrated) –
मासिक पाळीदरम्यान शरीर हायड्रेट ठेवा आणि भरपूर पाणी प्या. असे केल्याने क्रॅम्पसह ब्लोटिंग, अपचन यांसारख्या समस्याही टळतात.
३. हलका व्यायाम (Light Exercise) –
डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम किंवा योगासने करू शकता. थोडे चालणे तुम्हाला सक्रिय ठेवेल आणि क्रॅम्पपासून आराम देईल.
४. चरबीयुक्त अन्न टाळा (Avoid Fatty Food) –
चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स, जंक फूड, चिप्स, अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे क्रॅम्प्स वाढतात, त्यांच्यापासून दूर राहा. कमी चरबीयुक्त आणि जास्त फायबरयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या.
५. हिंग, ओवा आणि काळे मीठ (Asafoetida, Ajwain And Black Salt) –
हिंग, ओवा आणि काळे मीठ एका चमच्यात घेऊन कोमट पाण्यासोबत खावे. यामुळे वेदनांमध्ये लवकर आराम मिळू शकतो.
६. भरपूर झोप घ्या (Get Plenty Sleep) –
या दरम्यान, तणाव टाळण्याचा प्रयत्न करा आणि सुमारे 7-8 तास पुरेशी झोप घ्या. यामुळे क्रॅम्पपासून आराम मिळू शकतो.
७. हर्बल टी (Herbal Tea) –
मासिक पाळीच्या काळात आंबट आणि थंड पदार्थांचे सेवन करू नये. अशावेळी हर्बल टी हा एक उत्तम पर्याय आहे. आले, वेलची, काळी मिरी वगैरे घालून दुधाशिवाय चहा बनवू शकता.
(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)