अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. माझ्या विजयाचा मुख्य मंत्र काम आहे आणि जसखार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जसखार गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वरी देवीच्या आशीर्वादाने काम करत राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच प्रणाली म्हात्रे यांनी जसखारवाशीयांना दिली आहे.

जसखार ग्रामपंचायतीच्या सरपंच काशिबाई ठाकूर यांचे पद हे शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र केले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्याचे आदेश उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांनी दिले होते. जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाच्या प्रणाली किशोर म्हात्रे यांनी बुधवारी (दि. २४) ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या कार्यभार स्विकारला आहे.
जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदाचा पदभार प्रणाली म्हात्रे यांनी स्विकारताच शिवसेना (शिंदे गट) महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव तथा उरण विधानसभा निरिक्षक रुपेश पाटील, उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, उरण पंचायत समितीचे माजी सदस्य दिपक ठाकूर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रीतम सुर्वे, ज्येष्ठ नेते सुरेश म्हात्रे, माजी सरपंच नितीन पाटील, युवा प्रमुख गणेश घरत, ग्रामपंचायत सदस्य हेमंत ठाकूर, दमयंती म्हात्रे, अशितोष म्हात्रे, धनवंती ठाकूर, राकेश तांडेल, वैजयंती ठाकूर, ग्रा. अध्यक्ष प्रिती ठाकूर, ग्रामविकास अधिकारी रुपंम गावंड यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सरपंच प्रणाली म्हात्रे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.