• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाळ्यात भाजलेला मका फक्त चवच नाही तर आरोग्याचीही घेतो काळजी, मिळतात हे फायदे

ByEditor

Jul 29, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
रिमझिम पावसात गरमागरम चटपटीत भाजलेला मका खाण्याची मजा वेगळीच असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या मका भाजून देणाऱ्याच्या स्टॉलवरील गर्दीवरून लोकांना त्याची चव किती आवडते हे दिसून येते. पण तुम्हाला माहित आहे का की मका फक्त चवच नाही तर आपल्या आरोग्याची ही विशेष काळजी घेतो. होय, मका म्हणजे स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले फायबर पचन चांगले राखतात. तर त्यात असलेले फायटोकेमिकल्स अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे पुढच्या वेळी भर पावसात मका भाजून खाताना त्याचे हे फायदे लक्षात ठेवा.

मका खाण्याचे फायदे

रोगप्रतिकार शक्ती वाढते
पावसाळ्यात अनेकदा व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. आजकाल अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कॉर्न अत्यंत फायदेशीर ठरू शकते. हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, कॉर्नमध्ये सर्व प्रकारचे मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजेच व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यात प्रथिने, सोडियम, व्हिटॅमिन ए, कार्बोहायड्रेट, बी जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम तसेच अनेक अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवून आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

वाढत्या वयाची लक्षणं कमी करते
वयोमानानुसार त्वचेवर होणारा परिणाम सुरकुत्यांच्या स्वरूपातही दिसू लागतो. परंतु बीटा कॅरोटीनने समृद्ध मका त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हे त्वचेचे फ्री रॅडिकल्स आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करून वृद्धत्वाचे परिणाम टाळण्यास देखील मदत करते.

बद्धकोष्ठता
पावसाळ्यात बद्धकोष्ठतेची समस्या अनेकदा लोकांना सतावते. अशावेळी या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मक्याचा आहारात समावेश करू शकता. मक्यात असलेले फायबर बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

डोळ्यांसाठी फायदेशीर
कॉर्नमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. मक्याचा आहारात समावेश करून डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेता येते.

वेट कंट्रोल
जर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये कॉर्नचाही समावेश करा. भाजलेल्या मक्याचा आहारात समावेश केल्यास वजन व्यवस्थापनास मदत होते. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी मानले जाते.

हाडे मजबूत ठेवते
मक्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. हे हाडांची घनता वाढवून ऑस्टिओपोरोसिसच्या जोखमीपासून देखील संरक्षण करू शकते. याशिवाय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि किडनीच्या समस्येवरही मका फायदेशीर ठरतो. तथापि, मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांनी मर्यादित प्रमाणात याचे सेवन केले पाहिजे.

ब्लड शुगर
मक्यामध्ये असलेले फायटेट्स, टॅनिन, पॉलिफेनॉल यांसारखे पोषक घटक पचनक्रिया मंदावतात. ज्यामुळे हाय ब्लड शुगर कमी होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!