महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता
वार्ताहर
उरण : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय. यशश्री शिंदे हिचा मोबाइल पोलीसांना सापडला आहे. उरण बेलापूर रेल्वेमार्गालगत शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना मोबाइल सापडला आहे. आता मोबाईल सापडल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरलाय. यशश्रीच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कर्नाटकमधून आरोपी दाऊद शेखला अटक केली होती. अशातच आता या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय.
यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. अखेर हा मोबाईल आता पोलिसांच्या हाती लागलाय. त्यामुळे याप्रकरणी अत्यंत महत्वाचा असलेला पुरावा पोलिसांना मिळालेला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आणखीन खळबळजनक खुलासे अन् महत्त्वाचे धागेदोरे समोर येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मागील पाच वर्षांपासून आमच्यामध्ये मोबाइलवरून संपर्क होत होता, अशी कबुली आरोपी दाऊद शेखनं अटकेनंतर दिली होती.