क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय १४ वर्षांखालील मुलांची आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा होणार असुन त्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी गुरुवार व शुक्रवार, दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी बी. पी. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इनामपुरी सेक्टर ३७ खारघर येथे घेण्यात येणार आहे. या निवड चाचणी करिता १ सप्टेंबर २०१० (०१/०९/२०१०) नंतर जन्मलेल्या खेळाडूंचा विचार करण्यात येईल.
निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. तरी सर्व खेळाडूंनी खालील दिलेली कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.
१) नवीन फोटो अपडेट आधार कार्ड झेरॉक्स प्रत.
२) जन्म दाखला झेरॉक्स प्रत
३) मागील तीन वर्षाची शाळेची मार्कलिस्ट झेरॉक्स प्रत
तसेच सर्व खेळाडूंनी सफेद क्रिकेट पोशाखात, स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह सांगितल्यानुसार, गुरुवार व शुक्रवार दिनांक २६ व २७ सप्टेंबर रोजी बी. पी पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इनामपुरी सेक्टर ३७ खारघर येथे, सकाळी ९ वाजता हजर रहावे. अधिक माहितीसाठी ९९८७१५४६५२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आरडीसीए अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांनी केले आहे.