• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांकडून कॉलेजला फुलझाडं भेट

ByEditor

Oct 13, 2024

आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज जोहेचा उपक्रम

विनायक पाटील
पेण :
तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज जोहे येथील इयत्ता अकरावी व बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉलेजला फुलझाडे भेट दिली. कॉलेजचे प्राचार्य गलांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या फुलझाडांचे कॉलेजच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण उपक्रमात प्राचार्य यू. एस. गलांडे, प्राध्यापिका आर. आर. म्हात्रे, प्राध्यापक के. ए. गोरे, प्राध्यापक ए. एस. माळी, प्राध्यापिका आर. बी. पाटील, प्राध्यापिका एस. एस. बच्छाव यांच्यासह 500 हुन अधिक विदयार्थी व कॉलेजचे कर्मचारी सहभागी झाले होते.

विजयादशमी व दसरानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल आणि आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज जोहे विद्या संकुलनात इयत्ता 11 वी आर्टस् तुकडीतील अ – ब वर्गातील आणि इयत्ता 12 वी आर्टस् तुकडीतील अ – ब वर्गातील विद्यार्थ्यांकडून फुलझाडांची रोपे कॉलेजचे प्राचार्य यू.एस.गलांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते कॉलेजच्या प्रांगणात फुलझाडांची लागवड करत वृक्षारोपण करण्यात आले व सदर फुलझाडांचे संगोपन व दररोज पाणी देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच देण्यात आली.

यावेळी प्राचार्य गलांडे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जहाँ है हरियाली, वहाँ है खुशहाली. निसर्ग व पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्व विदयार्थी व प्राध्यापकांनी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे. आपण सर्वांनी मिळून एकत्रित समाजकार्य केले तरच निसर्ग आपल्याला वाचवु शकतो. प्रत्येकाने आपल्या घरा शेजारी, गावात व परिसरात सुद्धा वृक्षारोपण केले पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी माहिती देत सदर उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक प्राचार्यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!