• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सोगाव येथील मुस्लिम समाज बांधवांसोबत माझे जिव्हाळ्याचे नाते, माझ्या कारकिर्दीची सुरुवात येथूनच -आ. महेंद्र दळवी

ByEditor

Oct 13, 2024

आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सोगाव, मूनवली भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोगाव, मूनवली येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शनिवार दि.१२ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विविध विकासकामांचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे सोगाव मुस्लिम समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सोगाव येथील मुस्लिम समाजासह इतर समाजातील अनेक लोकांसोबत माझे लहानपणापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत, सोगाव याठिकाणी आम्ही सर्व एकत्र बसून विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक व व्यावसायिक विषयावर चर्चा करत होतो, इथूनच पहिल्यांदा राजकीय वाटचालीची सुरुवात केली आहे. माझ्या राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर सर्वात आधी येथील कब्रस्थानची संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिले. या भागावर आणि या समाजावर माझे विशेष प्रेम आहे.अलिबाग, मुरुड, रोहा मतदारसंघातील मुस्लिम समाजाने मागील निवडणुकीत मला भरघोस प्रतिसाद दिला आहे, यापुढेही मला अशीच साथ मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. मापगाव ग्रामपंचायत हद्दीत आमदार निधीतून आम्हाला विकासकामे करण्यासाठी येथील स्थानिक ग्रामपंचायतीला अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील एनओसी दिली नाही, त्यामुळे याभागातील अनेक विकासकामे करता आली नाही, असा आरोप करत आपण सर्वांनी एकत्र येऊन यापुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्हाला साथ द्या, यामध्ये बदल होणे गरजेचे आहे, येत्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. यापुढेही तुम्हां सर्वांचे असेच प्रेम व सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे शेवटी सांगितले.

आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते सोगाव कब्रस्थानातील अंतर्गत रस्ता व सुशोभिकरण, सोगाव बौद्धवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, मूनवली येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व होळीचा माळ सुशोभिकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामांसाठी शिवसेना(शिंदे गट)मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही कामे मंजूर करून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जगदीश सावंत मुळे या भागात विकासाची गंगा वाहण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी सोगाव येथील ज्येष्ठ नागरिक इक्बाल कुर, शिवसेना(शिंदे गट) अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, शिवसेना(शिंदे गट)मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, माजी सदस्य विजय भगत, सोगाव मुस्लिमीन अध्यक्ष मुर्तुजा कुर, उपाध्यक्ष नजीर कुर, खैरुद्दीन कुर, मुदस्सर कुर, माजी अध्यक्ष मन्सूर कुर, मैनुद्दीन मेस्त्री, इस्माईल कुर, गणी कुर, शौकत अधिकारी, हाश्मत कुर, गुलजार कुर, इलियास हाफीज, शिराज खान, हानिफ कुर, उत्तम राऊत, प्रमोद थळे, जगदीश बारे, अजित हरवडे, सुनिल अनमाने, मोअज्जम पठाण, किफायत कुर, सलमान कुर, मुफ्ती अकिब कुर, संदेश पाटील, गीतेश करळकर, प्रतिक सावंत यांच्यासह शिवसेना (शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख छाया म्हात्रे, मोहिनी सावंत, नीला संदीमनी व सोगाव, मुनवली, चोरोंडे, मापगाव, मुशेत, बहिरोळे, बेलवली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!