• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘या’ गोष्टी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका, आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

ByEditor

Oct 19, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
अलीकडच्या काळात फ्रिजचा वापर प्रचंड वाढला आहे. जवळपास सर्वच लोकांच्या घरात फ्रिज दिसून येते. पालेभाज्या, विविध पदार्थ ताजे राहतात या समजणे अनेका लोक फ्रिजचा वापर करतात. फळे, भाज्या किंवा इतर काही खाद्यपदार्थ असोत, आपल्यापैकी अनेकांना ते ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला आवडते. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास त्या खराब तर होतातच शिवाय तुमच्या आरोग्यालाही हानी पोहचू शकते. त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? आणि त्याचे परिणाम काय होतात? हे आपण जाणून घेऊया.

हे’ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळा-

टोमॅटो आणि कांदा-
दररोजचे खाण्यापिण्याचे साहित्य आपण फ्रिजमध्ये ठेऊन देतो. त्यामुळेच इतर भाज्यांप्रमाणेच तुम्हीही टोमॅटो आणि कांदा फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करत असाल तर लगेचच थांबवा. आहारतज्ज्ञांच्या मते, यामुळे केवळ त्यांचा पोतच खराब होत नाही तर फ्रीज त्यांच्यातील आर्द्रता शोषून घेतो. ज्यामुळे या गोष्टी खराब होऊ लागतात. आणि हेच पदार्थ जर तुम्ही जेवणासाठी वापरलात तर तुमच्या आरोग्याला मोठे नुकसान पोहचू शकते.

केळी-
बहुतांश लोक आपल्या आहारात केळींचा समावेश करतात. त्यामुळे दररोजच केळी घरात उपलब्ध राहण्यासाठी जास्त प्रमाणात खरेदी करतात. अशात केळी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, असे केल्याने ते ताजे राहण्याऐवजी ते लवकरच काळे पडतात. इतकेच नव्हे, तर त्याच्यामुळे आजूबाजूला ठेवलेली फळे आणि भाज्याही वेळेआधीच खराब होऊ लागतात. त्यांच्यात निर्माण झालेल्या इथिलीन नावाच्या वायूमुळे असे घडते. त्यामुळे हे फळ नेहमी उघड्यावर ठेवा. अन्यथा ते पदार्थ खाऊन तुमचे आरोग्य बिघडू शकते.

ब्रेड-
ब्रेड किंवा त्यापासून बनलेले पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक अजिबात करू नये. कारण ब्रेडमध्ये त्यामध्ये असलेले यीस्ट थंड वातावरणात खराब होऊ लागते. अशा स्थितीत त्यांना ताजे ठेवण्याचे तर सोडाच ते खाण्या योग्यसुद्धा राहात नाही. असे ब्रेड खाल्य्याने तुमच्या पचनशक्तीलाही हानी पोहोचते. शिवाय विविध पोटाचे आजार उद्भवतात.

बटाटा-
बटाटा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास बटाट्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होऊ लागते. आणि त्याच्या चवीवरही मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आवडत असेल तर ते करणे लगेच थांबवा. अथवा अशाने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता असते.

लोणचे-
भारतीय घरांमध्ये लोणचे सर्वांच्याच घरात आढळते. अनेकदा लोणचे दीर्घकाळ टिकवण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवणे अनेकांना आवडते. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, असे केल्याने लोणचे तर खराब होतेच शिवाय त्याच्या जवळ ठेवलेल्या वस्तू देखील खराब होतात. त्याचा वास फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंमध्ये जातो. आणि विशेषतः दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू चुकूनही लोणच्यासोबत ठेवू नयेत. लोणच्यामुळे इतर वस्तूंवर परिणाम होऊन बुरशी लागण्याची शक्यता असते. अशाने ते पदार्थ चुकून जर कोणी खाल्ले तर आरोग्य बिघडू शकते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!