• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रविवार स्पेशल पोटॅटो बॉल्स, अगदी कमी साहित्यात बनेल क्रिस्पी, चमचमीत रेसिपी

ByEditor

Oct 20, 2024

रविवार म्हटलं की प्रत्येक घरात काही न काही हटके शिजतं. रोज तेच तेच चपाती भाजी आणि पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आपण डिनर अथवा स्नॅक्समध्ये काहीतरी हटके बनवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला चमचमीत खाण्याची इच्छा होते. आपण रविवार स्पेशल डिश पोटॅटो बॉल्स करू शकता. हि रेसिपी झटपट बनते, चवीला देखील उत्कृष्ट लागते. आपल्या घरात बटाटे आणि ब्रेड हे साहित्य उपलब्ध असतेच. त्यापासून ही चमचमीत रेसिपी झटपट तयार करा. कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल. कारण बटाटा हा पदार्थ प्रत्येकाला आवडतो. जर त्याला ब्रेडची साथ मिळाली तर नक्कीच ही रेसिपी अफलातून लागत असेल यात शंका नाही. चला तर मग या कुरकुरीत रेसिपीची कृती पाहूयात.

पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • बटाटे
  • ब्रेड
  • मीठ
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • तेल
  • पाणी

कृती

सर्वप्रथम बटाटे शिजवून घ्या. बटाटे चांगले शिजल्यानंतर त्याचे साल काढून घ्या व सोललेले बटाटे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि एका ब्रेडचे तुकडे टाका. आता है संपूर्ण मिश्रण चमचा अथवा हाताने मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यात ब्रेड बुडवून घ्या व त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.

पाणी काढल्यानंतर त्यात बटाट्याचे तयार मिश्रण टाका व त्याला हाताने गोलाकार आकार द्या. अशा प्रकारे सगळे पोटॅटो बॉल्स रेडी करून घ्या. दुसरीकडे कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात पोटॅटो बॉल्स तळून घ्या. अशा प्रकारे पोटॅटो बॉल्स केचअप अथवा ग्रीन चटणीसह खाण्यासाठी रेडी.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!