• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

थंडीत भेगांपासून “अशी” घ्या पायाची काळजी

ByEditor

Oct 29, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम पुरेसे नाही तर साफसफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी बूट-चप्पल इत्यादी घाला. पायांची योग्यप्रकारे साफसफाई करा.

वेळोवेळी पेडीक्योर करीत राहणे पायाच्या त्वचेला नरमपणा आणते. आंघोळ करताना पायांना वैसलीन तेल इत्यादी लावावे. शिवाय बाहेर जाताना पायांवर चांगल्या प्रतीचे क्रीम लावावे. ज्यामुळे पाय मुलायम राहतील. पायाचा कोरडेपणा थांबवण्यासाठी दररोज रात्री पाय चांगल्याप्रकारे धुऊन क्रीम लावून झोपावे. त्यामुळे पाय कोमल राहतील.

पायांची त्वचा मुलायम होण्यासाठी आणि संक्रमण टाळण्यासाठी व्हिटॅमिन ई युक्त जैतून तेल वापरावे. जैतून तेल अँटी आक्सिडंट्सने भरपूर असते, जे त्वचेला मृदू बनविते. व्हिटॅमिन आणि प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेसह पायांच्या नखांचीही देखभाल खूप आवश्यक आहे. अशात तुम्ही त्वचेचा नरमपणा कायम ठेवण्यासाठी किमान पंधरा दिवस पेडिक्योर करा. पायांना जास्त गरम पाण्यांनी धुऊ नका. एवढे करूनही तुमची त्वचा कोरडीच राहिली तर त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

पाय सांभाळणे, त्यांच्याकडे नियमित लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. पायाची नखे कापताना ती बोटांलगोलग न कापता थोडे अंतर ठेवून कापली पाहिजेत. त्वचा कोरडी होत असेल तर त्यावर त्वचा मुलायम करणारी औषधे किंवा तेल लावले पाहिजे.

पायाला भोवरी असेल तर ती काढून घेतली पाहिजे. स्लीपर किंवा अर्धा अधिक पाय उघडा ठेवणाऱ्या चपला वापरण्याऐवजी बूट वापरले पाहिजेत. पायाच्या संवेदना कमी झाल्या तर नियमितपणे पाय तपासायला हवेत. पायाची खालची बाजू आपल्याला दिसत नसल्यास आरसा घेऊन कुठे जखम आढळली तर ती गोष्ट त्वरित डॉक्टरांच्या नजरेस आणून दिली पाहिजे. अनवाणी चालणे टाळले पाहिजे.

(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!