• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विराट कोहलीचा ‘दे धक्का’, ICC कडून मोठी कारवाई

ByEditor

Dec 26, 2024

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार 26 डिसेंबर पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूंशी भिडला. सामन्यादरम्यान विराटने सॅम कोंस्टसला धक्का मारला ज्यामुळे त्याने वाद ओढवून घेतला आहे. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली असून दंड देखील ठोठावला आहे.

मेलबर्न टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची 10 वी ओव्हर सुरु असताना विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोंस्टसला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये मैदानात वादही झाला. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि मैदानातील अंपायरनि मध्यस्ती केली आणि वाद मिटवला. ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.12 नुसार आंतरराष्ट्रीय खेळाडू, खेळाडूचा सहाय्यक कर्मचारी, अंपायर, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य आणि जाणूनबुजून शारीरिक संपर्क करणे हा लेव्हल 2 चा गुन्हा आहे. विराट कोहलीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टने केलेले निर्बंध मान्य केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.आयसीसीने कारवाई केली असून यात विराट कोहलीवर मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1872083757395824886

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!